It4doctors in English /Marathi
आमचे कार्य

आमचे कार्य

Print
आमचे कार्य

आमचे कार्य

IT4Doctors हे व्यवसायिक स्वरुपात निर्माण केलेले एक संकेतस्थळ आहे. ह्याच्या सहाय्याने संपुर्ण भारतातील स्वास्थ्य चिकिस्तक व स्वास्थ्य विभागातील व्यावसायिकांना माहिती तंत्रज्ञानाचा व अभिनव तंत्रज्ञानाचा उपयोग होईल.

IT4Doctors हा ८ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आहे ज्यामध्ये भाग घेणा-यांना संगणाकाची आधारभुत माहिती व संगणकाच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेयरची अभ्यासगोम माहिती दिली जाईल. त्या माहितीवर त्यांचा चांगला सराव करुन घेण्यात येईल व संगणक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येईल. या तंत्रज्ञानामुळे स्वास्थ्य शाखेत व सेवेत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यास मदत होईल.

IT4Doctors द्वारे तंत्रशास्त्रातील पैलु सहकार्यांबरोबर माहितीची देवाण-घेवाण व स्वत:ला स्वास्थ्य सेवेच्या नुतन वातावरणमध्ये रुची निर्माण होईल. IT4Doctors चे प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर ,प्रत्येक प्रशिक्षणार्थीस IT4Doctors चे प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. त्या द्वारे प्रशिक्षणार्थी त्यांच्या प्रशिक्षणची माहिती नजीकच्या विभागात व आपल्या जवळपासचांना देऊ शकतात.

या कार्यक्रमाद्वारे माहिती तंत्रशास्त्राचा स्वास्थ्य विभागातल्या व्यावसायिकांना परिणामकारक उपयोग होऊ शकतो ह्यामुळे त्यांना जगात कुठेही संपर्क साधता येईल लोकांशी जुडतायेईल, त्यांचे मतं, विचार व्यक्त करण्याची संधी मिळेल व या ज्ञानाच्या देवाण-घेवाणमध्ये भौगोलिक सीमांचे बधंनही येणार नाही.

कार्यक्रमातील मुख्य विशेष:
  •  प्रस्तावनेच्या सत्रात माहिती तंत्रज्ञान व इंटरनेटचा सहज उपयोग व फायदा याची माहिती, काही पुर्वग्रह, भिती काढणे. माहिती तंत्रज्ञान व इंटरनेटच्या संदर्भातील मुद्दयावर स्पष्टीकरण : १ सत्र
  •  हार्डवेयर / सॉफ्टवेयर आणि आवश्यक सुविधांवर त्वरित अवलोकन. या व्यतिरिक्त मोबाईल व टॅबलेटवर इंटरनेटचा उपयोग व वापर व नेटबुकच्या उपयोगावर विशेषभर : १ सत्र
  •  विचारक (सॉफ्टवेयर प्रोग्राम ),प्रचालन तंत्र (ऑपरेटिंग सिस्टम)याच्या उपयोगाची व वापरची संकल्पना: १ सत्र
  •  माहिती तंत्रज्ञान व इंटरनेटवर (प्रारंभिक प्रात्येकक्षिक माहिती) याचा आधारभुत आराखडा :१ सत्र
  •  साध्यासोप्या संचाराकरिता व सहयोगासाठी इंटरनेटचा वापर : ३ सत्रे
  •  C.I.M.S / M.I.M.S Online च्या प्रवेश करिता सामाजिक माध्यामाचा उपयोग : ३ सत्रे
  •  प्रशिक्षणाचे प्रात्येकक्षिके व ज्ञान मिळवणे व IT4Doctors Community मध्ये सहभागी होऊन एक प्रायोगी समुह निर्माण करणे : ३ सत्रे
  •  स्वास्थ्य (हेल्थ) पोरटल व त्याचा उपयोग : २ सत्रे
  •  इनटेल ह्याचे स्वास्थ्य संरक्षणासाठी माहिती तंत्रज्ञानाचा कार्याबद्दल :१ सत्र
  •  एकुण ३ तासाचे २२ सत्र = ६६ तास संपुर्ण प्रशिक्षणाची वेळ
 
 
 
 

An initiative by

Marathi.aarogya.com   Pune City & District Medical Practitioners Association Intel Healthcare IT Professionals