It4doctors in English /Marathi
आमच्या विषयी

आमच्या विषयी

Print
आमच्या विषयी

आमच्या विषयी

IT4Doctors हे व्यवसायिक स्वरुपात निर्माण केलेले एक संकेतस्थळ आहे. ह्याच्या सहाय्याने संपुर्ण भारतातील स्वास्थ्य चिकिस्तक व स्वास्थ्य विभागातील व्यावसायिकांना माहिती तंत्रज्ञानाचा व अभिनव तंत्रज्ञानाचा उपयोग होईल.
IT4Doctors हा ८ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आहे ज्यामध्ये भाग घेणा-यांना संगणकाची आधारभुत माहिती व संगणकच्या हार्डवेयर आणि सॉफ्टवेयरची अभ्यासगोम माहिती दिली जाईल. त्या माहितीवर त्यांचा चांगला सराव करुन घेण्यात येईल व संगणक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येईल .या तंत्रज्ञानामुळे स्वास्थ्य शाखेबद्दल व सेवेबद्दल माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यास मदत होईल.

IT4Doctors द्वारे तंत्रशास्त्रातील पैलु, सहकार्यांबरोबर माहितीची देवाण-घेवाण व स्वत:ला स्वास्थ्य सेवेच्या नुतन वातावरणामध्ये रुची निर्माण होईल. IT4Doctors चे प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर ,प्रत्येक प्रशिक्षणार्थीस IT4Doctors चे प्रमाणपत्र प्रदान केले याईल. त्या द्वारे प्रशिक्षणार्थी त्यांच्या प्रशिक्षणची माहिती नजीकच्या विभागात व आपल्या जवळपासच्यांना देऊ शकतात.

या कार्यक्रमाद्वारे माहिती तंत्रशास्त्राचा स्वास्थ्य विभागातल्या व्यावसायिकांना परिणामकारक उपयोग होऊ शकतो ह्यामुळे त्यांना जगाभर कुठेही संपर्क साधता येईल, नवीन लोकांशी जुडता येईल, त्यांची मतं, विचार व्यक्त करण्याची/जाणन्याची संधी मिळेल व या ज्ञानाच्या देवाण-घेवाणमध्ये भौगोलिक सीमांचे बधंनही येणार नाही.

आरोग्य.कॉम विषयी
आरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.कॉम खुपच लोकप्रिय आहे. आरोग्याविषयी सविस्तर माहिती पुरवण्यासाठी ही साईट बांधिल आहे. आरोग्य.कॉम ही साईट एक ब्रँड बिल्डिंगचे माध्यम आहे. आरोग्य.कॉम मधे वेगवेगळ्या विषयावर ५००० पानी माहिती उपलब्ध आहे. यावरुनच यासाईटमुळे मिळणा-या सखोल ज्ञानाची कल्पना येते. यात पर्यायी औषधे व प्रगत एलोपेथिकपद्धती व नवीन निदानपद्धतींचाही समावेश आहे. यासाईटमधे आपण आपल्या विचारांची देवाणघेवाणही करु शकतो. तसेच यात आरोग्य विषयक माहिती व आणखी इतर माहिती जलद मिळवता येईल असे तंत्र उपलब्ध आहे.

पुणे शहर व जिल्हा वैद्यकिय व्यावसायिक संघटना
पुणे शहर व जिल्हा वैद्यकिय व्यावसायिक संघटनेची स्थापना १९९५ साली झाली. संघटनेची संकल्पना धनकवडी व बिबवेवाडीतील काही समर्पित डॉक्टरांनद्वारे सुरु कराण्यात आली, पण कालांतरने या संघटनेचा विस्तार संपुर्ण पुणे शहर व शहराच्या पलीकडे झाला, म्हणुनच आता ह्याला पुणे शहर व जिल्हा वैद्यकिय व्यावसायिक संघटना असे म्हणतात.

बिबवेवाडी व धनकवडी वैद्यकिय व्यावसायिक संघटनेची स्थापना ९०च्या दशकाच्या आसपास झाली. या विभागात अपु-या वैद्यकिय सुविधा होत्या. संघटनेचा कार्यविस्तार बिबवेवाडी व धनकवडीपर्यंत सीमित न राहुन त्यात कात्रज विभागाचाही समावेश कारण्यात आला. कालांतराने लोकसंख्येत वाढ, शैक्षणिक प्रगती आणि औद्योगिक क्रांती झाली. ह्या क्रांतीमुळे वैद्यकिय चिकित्सा सेवा (General Practice) व संबंधित वैद्यकिय सेवा प्रदान करण-यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे.

मागील १५ वर्षात ,संघठणेच्या विकासात अद्‍अभुत प्रगती झाली आहे. काही उत्साही सदस्यानपासुन ते आज ५०० उस्तुक सदस्यांपर्यंत पुणे शहर व जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या विभागाशी व क्षेत्राशी आज जुडली गेली आहे. एक महान कल्पनाशील, रचनात्मक विचार व सकारात्मक दृष्टिकोणासोबत गतिशील, ठोस व उत्साहपुर्ण नेतृत्वामुळे पुण्याच्या नकाशावर आज या संघटनेचे मानाचे स्थान आहे.

संघटना विविध कार्यक्रमात सहभाग घेते जेणेकरुन सामान्य लोकांना स्वास्थ्या संबंधी माहितीचा उपयोग होईल व त्याच बरोबर वैद्यकिय व्यावसायिकांना त्याचा लाभ मिळेल.

म.न.पा चे १४ नंबर वार्ड कार्यालयाची स्वास्थ्य क्षेत्रे, विविध विद्याल्यांमध्ये/शाळांमध्ये स्वास्थ्य शिबीर, डॉक्टर प्रोटेक्शन अ‍ॅक्ट आणि संघटना यांचा स्वाईन फ्लूच्या उद्रेकाच्या व्यवस्थापनात सक्रिय सहभाग, इत्यादी पुढाकारांसाठी ,सुचना आणि माहिती प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांच्या द्वारे कौतुक करण्यात आले.

 
 
 
 

An initiative by

Marathi.aarogya.com   Pune City & District Medical Practitioners Association Intel Healthcare IT Professionals